A memoir in Marathi (मराठी) of our week-long road trip in the Canadian Rockies – Heaven on Earth – visiting Banff, Yoho and Jasper National Parks, as well as Calgary and Edmonton in the Province of Alberta.
Click for: Part One | Part Two

आता “एमरल्ड लेक” (Emerald Lake) – नावासारखंच आहे अगदी, एमरल्ड खड्याच्या रंगाचं. पण तुम्ही म्हणाल कुठे आहे हे आता आणि कसं जायचं या तळ्यावर. लेक लुइस पासून थोड्याच अंतरावर “ब्रिटिश कोलंबिया” (British Columbia) प्रांतात “योहो (Yoho) राष्ट्रीय उद्यान”आहे. या उद्यानातच आहे हे तलाव. आणि हे योहो राष्ट्रीय उद्यान जास्पर ला जायच्या वाटेवर आहे त्यामुळे लेक लुइस बघून आल्यावर दुसऱ्या दिवशी बँफ मधून आम्ही आमच्या Bags उचलल्या आणि चेक आउट करून निघालो योहो राष्ट्रीय उद्याना च्या दिशेने. खरतर रॉकी पर्वतरांगांमध्ये फिरायला २ रस्ते आहेत, एक म्हणजे ‘ट्रान्स कॅनडा हायवे’ आणि दुसरा म्हणजे अगदी जंगलाच्या जवळून आतून जाणारा ‘Bow Vally Parkway – Highway 1A’.
हायवे वरून आपल्याला लांबच लांब डोंगररांगा, नद्या, तलाव दिसतात. थोडक्यात म्हणजे view दिसतो, पण आतल्या रस्त्याने एक वेगळीच मज्जा आहे आणि थ्रील आहे आणि ते म्हणजे जंगलाचा खजिना, wild life. या रस्त्याने जाताना माझी excitement तर खूपच वाढली होती. आम्ही बघत बघत चाललो होतो कि काही दिसतंय का ते. आणि देवाची कृपा आणि आमच्या नशिबाने आम्हाला वेगवेगळी हरणं, सांबर आणि चक्क काळं अस्वल आणि त्याचं छोटं पिल्लू पण दिसलं. धन्य वाटलं.