Bharari

Taking Flight…
Subscribe

विवा मिहिको! (Viva Mexico!) – भाग १

SubscribeFiled Under: Export, Marathi Articles, Mexico,by Bhakti

Write-up in मराठी (Marathi) of our week-long trip to the most populous city in North America – Mexico City – where we managed to get around without taking a single taxi and having no knowledge of Spanish!

Click for: Part One | Part Two

फेलिस नविदाद! Feliz Navidad (Merry Christmas)!

फेलिस नविदाद! Feliz Navidad (Merry Christmas)!

“ओला”, “ग्रासिआस”, पेरडॉन, “क्वानतो क्वेस्टा एस्टो “, “डोंडे एस्टा”… काय? ऐकल्यासारखं वाटतंय का कुठे? हे एवढे वाक्प्रचार शिकलात, की तुम्ही अर्धी लढाई जिंकलीतच असं समजा.(पण अर्धीच बरं का) समोरच्या माणसाला खुश करायला हे एवढे शब्द पुरेसे आहेत. आता तुम्ही म्हणाल, काय बड़बडतीये ही! आणि मान्य आहे लढाई जिंकू वगैरे, पण कसली लढाई आणि हे रणांगण आहे तरी कुठे? तर हे आहे जगातील साधारण ४० करोड लोकांची मातृभाषा असलेल्या आणि इंग्रजीचीच बाराखडी आणि मुळाक्षरं असलेल्या “स्पानिश” (Spanish) भाषेचं.

“ओला” (Hola) म्हणजे “नमस्कार”, “ग्रासिआस” (Gracias) म्हणजे “धन्यवाद”, “पेरडॉन” (Perdon) म्हणजे “माफ करा”, “क्वानतो क्वेस्टा एस्टो?” (Cuánto cuesta esto) म्हणजे “ह्या गोष्टीची किंमत किती?” आणि “डोंडे एस्टा?” (Donde esta) म्हणजे “ही जागा कुठे आहे?”. आता तुम्हीच सांगा, ते लढाईचं वगैरे बरोबर म्हटलं की नाही मी? आजपर्यंत माझा असा गोड गैरसमज होता की इंग्रजी भाषा आली की जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात प्रवास करता येतो, काहीही अडचण येत नाही. पण तो गेल्याच वर्षी पूर्णपणे दूर झाला. आणि ह्याचं निमित्त म्हणजे उत्तर अमेरिकेतील एक देश आणि त्याचं नाव आहे “मेक्सिको” (Mexico).

वर म्हटल्याप्रमाणे स्पानिश चा हा एवढाच गृहपाठ करून आम्ही निघालो उत्तर अमेरिकेतील मेक्सिको देशाला.

जेव्हा आम्ही मेक्सिको ला जायचं ठरवलं, तेव्हा बऱ्याच जणांकडे आम्ही चौकशी केली, कसं आहे वगैरे. तशी सगळ्यांची प्रतिक्रिया चांगलीच होती. पण जे कोणी भेटत होतं ते म्हणे “कॅनकून” (Cancun) खूप छान आहे. कॅनकून मधली Resorts चांगली आहेत. कॅनकून चा समुद्रकिनारा खूप स्वछ आणि सुंदर आहे, आम्हाला फारच आवडला”. आम्ही म्हटलं, सगळे कॅनकून कॅनकून का करतायत? आम्ही तर “मेक्सिको सिटी” (Mexico City) (मेक्सिको च्या राजधानी) ला जायचा विचार करतोय. पण मेक्सिको सिटी चं नाव ऐकलं की सगळ्यांची तोंडं वाकडी होत होती. इथे टोरोंटो (Toronto) मध्ये आमच्या ओळखीचं कोणीही मेक्सिको सिटी ला गेलं नाही आणि जातही नाही. सगळ्यांचं मत असं होतं की तिथे जाणं अजिबात सुरक्षित नाही. तिथे गुन्हेगारीच प्रमाण खूप आहे. तुम्ही कॅनकूनलाच जा, वगैरे वगैरे. म्हणजे मेक्सिको देशात गुन्हेगारी बऱ्याच प्रमाणात आहे हे सत्य तसं जगजाहीर आहे. आणि त्याची कारणं म्हणजे ड्रग्स आणि पैसा. परंतु ह्या चोर्यामाऱ्यांचं प्रमाण मेक्सिको आणि अमेरिकेच्या सीमारेषेवर जास्त आहे. आणि मेक्सिको सिटी ही मेक्सिको देशाच्या बऱ्यापैकी खाली, दक्षिणेला आहे.

खरं सांगायच झालं तर कॅनेडीयन (Canadian) लोकांसाठी परमोच्च पातळीवर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे “सुरक्षितता” (safety). आणि या बाबतीत इथली लोकं थोडी सुद्धा जोखीम घेत नाहीत. “इट्स नॉट सेफ” हे शब्द अगणीत वेळा माझ्या कानावर पडले आहेत. तेव्हा निष्कर्ष असा की ह्यांच्या मते मेक्सिको देशातील कानकून सिटी सोडून बाकी कुठलीही जागा सुरक्षित नाही आणि मेक्सिको सिटी (राजधानी) तर नाहीच नाही. आता तुम्ही म्हणाल ही कानकून सिटी आहे तरी काय. तर हे एक समुद्रकिनारी वसलेलं भरपूर संख्येने “Beach Resorts” असलेलं शहर आहे. म्हणजे इथल्या एका Resort मध्ये राहायचं, तिथेच मस्त खायचं प्यायचं, आजूबाजूला थोडं भटकायचं, Site seeing करायचं आणि समुद्रकिनारी आराम करायचा. म्हणजे मेक्सिकोशी तसा तुमचा काहीही संबंध येत नाही. तुम्हाला कळणार देखील नाही की तुम्ही मेक्सिकोत आहात की अजून कुठे आणि इंग्रजी भाषा येत असेल तर तुमचं सगळंच काम झालं असं समजा. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर शॉपिंग मॉल सारखं. जगातील कुठल्याही शॉपिंग मॉल मध्ये जा, आत शिरलं की सगळं सारखंच. पण सुरक्षित.

आम्ही मात्र ठरवलं होतं की कितीही नकार मिळाले तरी मेक्सिको सिटीच. गेल्याशिवाय कळणार तरी कसं आणि मग त्याविषयी व्यवस्थित रिसर्च देखील केला. तो न करता मात्र आम्ही सहसा अनोळख्या ठिकाणी जात नाही. नीरज ने तर जय्यत तयारी केली होती. रस्त्यांचे नकाशे, रेल्वेरूट्स चे नकाशे, हॉटेल्स ची नावं, त्यांचे पत्ते, प्रेक्षणीय स्थळांची माहिती वगैरे वगैरे. आणि या वेळी आम्ही मोठ्या bags न घेता backpacks घेऊन जायचं ठरवलं. मी सुरुवातीला थोडी कटकट केली की पाठीवर ओझं कशाला वगैरे. पण नंतर म्हटलं ठीक आहे, बघूया तरी आपल्याला जमतंय का इतके दिवस backpack घेऊन प्रवास करणं. आणि अशी ही १०-१२ किलोची बोचकी पाठीवर घेऊन आमचा प्रवास सुरु झाला.

मेक्सिको

मेक्सिको

विमानाने साधरण ४.३० तासात आम्ही टोरोंटोहून मेक्सिको ला पोहोचलो. मेक्सिको विमानतळावरून मुख्य सिटीत जाण्यासाठी “मेट्रो रेल्वे” (Metro train) आहे हे आम्हाला आधीच माहित होतं. आता प्रश्न असा होता की ह्या मेट्रो रेल्वे पर्यंत पोहोचायचं कसं. विमानतळावरच काही लोकांना आम्ही विचारायचा प्रयत्न केला पण कोणालाच कळत नव्हतं आम्ही काय बोलतोय ते. आणि त्याच क्षणी सत्य परिस्थितीची जाणीव झाली, की इथे आपलं काही खरं नाही . स्पानिश बोलाण्यावाचून गत्यंतर नाही. तिथे कुणालाही इंग्रजी येत नव्हतं. मग आम्ही आमचं इंग्लिश ते स्पानिश भाषांतराचं पुस्तक बाहेर काढलं. आणि शब्दांची जुळवा जुळावी करून “मेट्रो स्टेशन कुठे आहे?” हा प्रश्न तयार केला. तेवढ्यात आम्हाला तिथे २ पोलिस दिसले, म्हटलं ह्यांनाच विचारावं. आणि “ओला! डोंडे एस्टा मेट्रो ” असं प्रेमाने विचारल्यावर त्यांनी आम्हाला बरोब्बर वाट दाखवली. चला, पहिली परीक्षा तरी पास! विमानतळाच्या मुख्य इमारती मधून बाहेर (रस्त्यावर नाही) आलं की त्यालाच लागून डाव्या बाजूला हॉटेल च्या corridor सारखी लांबच लांब गल्ली आहे. इथे बरीच लहान लहान दुकानं आहेत. त्यात बरीच चलन विनिमयाची (currency exchange) ची दुकानं देखील होती. कॅनडा पेक्षा इथे फारच चांगला भाव मिळत होता, पण कॅनडा मधून आम्ही आधीच मेक्सिकन चलन आणलेलं असल्यामुळे या rate चा फायदा आम्हाला झाला नाही. पण तुम्ही ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. असो आणि बरंच अंतर चालत गेल्यावर शेवटी आम्ही मेट्रो स्टेशन ला पोहोचलो.

मेक्सिकोतील कार्यक्षम मेट्रो

मेक्सिकोतील कार्यक्षम मेट्रो

मेक्सिको शहरातील मेट्रो व्यवस्था ही न्यू यॉर्क (New York) नंतर उत्तर अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी भुयारी (subway) मेट्रो सुविधा आहे. मेक्सिको शहरात राहणाऱ्या जवळ जवळ ९० लाख लोकांपैकी सरासरी ४० लाख लोकं रोज या मेट्रो सुविधेचा लाभ घेतात. १२ निरनिराळ्या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या या मेट्रो ट्रेन ने मेक्सिको शहरात इतकं सुटसुटीत जाळ विणलं आहे की अगदी सहजपणे एका मेट्रो लाईन वरून दुसऱ्या लाईन वर जाता येतं. प्रत्येक मार्गाला वेगळा रंग दिला आहे. म्हणजे मुंबई उपनगरीय रेल्वे चे जसे Central, Western, आणि Harbour हे ३ मुख्य मार्ग आहेत, तसेच मेक्सिको शहरात मेट्रो रेल्वेचे १२ प्रमुख मार्ग आहेत आणि त्यांना वेगवेगळी नावं नसून नंबर आणि रंग आहेत. आणि या subway मेट्रो ची वारंवारता (frequency) तर इतकी चांगली आहे की दिवसभरात कुठल्याही वेळी अगदी २-२ मिनिटाला एक मेट्रो आहे. आणि तिकीट तर इतकं स्वस्त आहे की केवळ ३ पेसोज (pesos- Mexican Currency) मध्ये कुठल्याही मार्गावरून कुठेही जाता येतं. सार्वजनिक वाहतुकीच्या सोयींच्या बाबतीत मेक्सिको शहराचं खरंच कौतुक करायला हवं. इतक्या सुरळीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने या मेट्रो व्यवस्थेची आखणी केली आहे, की आम्हाला आमच्या ८ दिवसांच्या प्रवासात एकदाही taxi किंवा खाजगी गाडी करावी लागली नाही. आम्ही सगळा प्रवास मेट्रो आणि बसनेच केला.

भुयारी मेट्रो चा प्रवेश. तिकीट असल्याशिवाय इथून आत जाता येत नाही

भुयारी मेट्रो चा प्रवेश. तिकीट असल्याशिवाय इथून आत जाता येत नाही

या मेट्रोत आणि भारतीय लोकल ट्रेन मध्ये आणखी एक साम्य म्हणजे “फेरीवाले”. कंगवे, च्विङ्गम, बिस्किटं, पेन, पेन्सिल, रंगीबेरंगी स्टिकर्स, खेळणी, नवीन गाण्यांच्या CDs (watch video), अगदी काहीही विकायला येणारी माणसं सतत मेट्रोभर फिरत असतात. आणि या cd विकणाऱ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे लोक पाठीवर मोठं music player आणि पोटावर speaker घेऊन जोरजोरात गाणी वाजवत फिरत असतात. म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा पर्याय काही आपल्याला नाही. ह्या लोकांचे कपडे आणि तब्येत बघून वाटणार देखील नाही की ह्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे असं. आणि एक धष्टपुष्ट बाई तर झीन्स आणि तोकडा टी शर्ट घालून, तान्ह्या पोराला पोटावर बांधून भिक मागत फिरत होती. माझ्या मनातील “भिकारी” या मानव जातीच्या संज्ञेत ही बाई कुठेही बसत तर सोडाच, पण घुसत देखील नव्हती. कदाचित मेक्सिको शहरात सगळ्यांचाच पेहेराव पाश्चिमात्य असल्यामुळे मला हे सत्य पचवणं कठीण जात होतं. असो मग अशा प्रकारे या मेट्रोने आणि नंतर थोडं चालत आम्ही आमच्या हॉटेलच्या रस्त्याला लागलो.

"Boot polish"- On the top of the world!

“Boot polish”- On the top of the world!

आमचं हॉटेल मेट्रो स्टेशन जवळच “झोना रोजा” (Zona Rosa) परिसरात होतं. रविराज माथ्यावर कडकडत होते आणि पोटात मेक्सिकन कावळे, चिमण्या स्पानिश मध्ये कावकाव करत होते. तेव्हा म्हटलं मस्तं खादाडी करून मग हॉटेल वर जाऊया आणि एका छोट्याशा restaurant मध्ये घुसलो. मेनू बघितला आणि बराच वेळ बघतच बसलो. आत्ता कळेल, मग कळेल, एखादा शब्द तरी आमच्यावर दया माया दाखवेल. पण कसलं काय! सगळंच आमच्या बुद्धीच्या ४ फूट वरून जात होतं. त्या पदार्थांमधील काय शाकाहारी आणि काय मांसाहारी हे कळतंच नव्हतं. मला तर असं वाटतं की “शाकाहारी” आणि “मांसाहारी” या कल्पना केवळ आपल्याच देशात आहेत. तो बिचारा वेटर २-३ वेळा येऊन हताश होऊन गेला. मनात म्हणत असेल काय पण लोकं आहेत, उगाच टेबल अडवून बसलेत. आणि मग आमचं महान पुस्तक आमच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात नाही पण शब्द दयायला स्वतःहून बाहेर आलं. मैत्री असावी तर अशी. आणि आमच्या अजाण बुद्धीला २ नवंशब्दांची ओळख करून दिली, एक म्हणजे “vekheterian (vegetarian)” आणि दुसरा “pollo (चीकन)” परंतु ह्याचा उच्चार “पोयो” असा करतात. त्यातला पहिला शब्द त्यांना काही केल्या कळेना. कदाचित आमची बोलण्याची पद्धत चुकीची असेल. पण दुसऱ्याने मात्र आम्हाला वाचवलं. म्हणजे म्हणतात ना “बुडत्याला काडीचा आधार” तसं “भुकेलेल्याला कोंबडीचा आधार”. आणि मग त्या मेनू मधील ज्या ओळींमध्ये “पोयो” हा शब्द होता असे २ पदार्थ -” पोयो टाको पेचुगा” (Pollo Taco Pechuga) आणि “बुरीटो पेच पोयो” (Burrito Pech Pollo) आम्ही मागवले. मनात म्हटलं, एवढी मोठी पदार्थांची यादी आणि आपल्या लायकीचे फक्त दोनंच! असो, भागातीये ना भूक! मग ठीक आहे. इथे लोकं “बीफ” (beef) (गायीचं मांस) आणि “पोर्क” (pork) (डुकराच मांस) सर्रास खात असल्यामुळे अर्ध्या अधिक मेनूत हेच दोन पदार्थ होते, असं आम्हाला आमच्या dictionary ताईने सांगितलं. त्यामुळे आमच्यासाठी तो पर्याय लागू नव्हता. स्पानिश भाषेचं थोडं सामान्य ज्ञानं म्हणून सांगते, “बीफ” ला “कार्ने दे रेस” (Carne de res/vaca) आणि “पोर्क” ला ‘कार्ने दे सेर्दो” (Carne de cerdo) असं म्हणतात. असो आणि अशा प्रकारे आमच्या भूलेलेल्या आत्म्याला शांत करून आम्ही तिथून निघालो.

वाचून बघा बरं, कळतंय का काही :)

वाचून बघा बरं, कळतंय का काही 🙂

हॉटेल वर जाताना रस्त्याने बरीच लोकं ये जा करताना दिसत होती. परंतु अगदी स्टेशनातून बाहेर आल्यापासून एक गोष्ट आम्हाला सतत आणि प्रकर्षाने जाणवत होती. सुरुवातीला आम्ही दुर्लक्ष केलं. पण नंतर नंतर तर ते दुर्लक्ष करण्याच्या पलीकडे गेलं. या “झोना रोजा” परिसरात ठिकठिकाणी ही दृश्य बघायला मिळतात. आता तुम्ही म्हणाल किती ताणतीये ही! काय दिसलं काय एवढं? सांगते. तर या परिसरात जागो जागी समलिंगी प्रेमवीर आणि प्रेमिका अगदी गळ्यात गळे घालून आणि त्याही पेक्षा पुढल्या पातळीवर व्यवहार करताना दिसतात. अगदी उघडपणे सगळं चाललेलं असतं. लपून छापून करण्यापेक्षा जगाची पर्वा न करता “खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो” या तत्वावर प्रेम करायला देखील धमक लागते, नाही? कुठल्याही व्यक्तीसमुहाला दुखावण्याचा माझा किंचितही हेतू नाही. उलट या बिनधास्तपणाचं नवलंच आहे आणि या बाबतीत प्रत्येकाचं मत वेगळंच असणार. जगातला प्रत्येक माणूस वेगळा असतो, या गोष्टीवर माझा ठाम विश्वास आहे. आणि कदाचित आमचं हॉटेल दुसऱ्या कुठल्या परिसरात असतं तर ही गोष्ट आम्हाला कधीही जाणवली नसती. परंतु आम्ही जे बघितलं, ती सत्य परिस्थिती आहे आणि ती तुमच्यापासून लपवून ठेवायची गरज मला वाटत नाही.

"El Angel" Tower at Zona Rosa area

“El Angel” Tower at Zona Rosa area

मेक्सिको शहरातील मुख्य आकर्षण म्हणजे “मेट्रोपॉलीटन कथेड्रल” (Metropolitan Cathedral). मेक्सिको देशातील हे सर्वात मोठं चर्च आहे. हे चर्च ज्या चौकात उभं आहे, तो चौक जगातील आकाराने मोठया असलेल्या चौकांपैकी एक आहे. मेट्रो रेल्वेने आम्ही “झोकॅलो” (Zocalo) स्टेशन वर उतरलो आणि बाहेर आलं की लगेच हे भलं मोठ्ठं चर्च दिसतं. चर्च मध्ये बरीच लोकं होती आणि सगळ्यांची नजर एका भल्या मोठ्या दरवाजावर खिळली होती. असं वाटत होतं की सगळे कोणाची तरी वाट बघत आहेत. बरेच फोटोग्राफरस देखील त्या दरवाजासमोर सज्ज होते. आणि तेवढ्यात सरळ ओळीने काही लोक सफेद आणि काळ्या रंगाचे पायघोळ झगे घालून, हातात मेणबत्या घेऊन त्या गूढ खोलीतून बाहेर आले आणि शेवटी त्यांच्या मागून सोनेरी लांब झगा परिधान केलेले, डोक्यावर मुकुट आणि हातात सोनेरी राजदंड घेऊन मेक्सिको देशातील रोमन धार्मिक संप्रदायातील सर्वोच्च पदावर असलेले त्यांचे धर्मगुरू बाहेर आले. आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी बरीच लोकं दोन्ही बाजुंना ओळीने उभी राहिली. आणि मग त्यांच्या प्रार्थना, गाणी, भाषणं, असा सगळा कार्यक्रम होता. थोडे फोटो काढून आम्ही बाहेर पडलो.

"मेट्रोपॉलीटन कथेड्रल" (Metropolitan Cathedral)

“मेट्रोपॉलीटन कथेड्रल” (Metropolitan Cathedral)

Inside the Cathedral

Inside the Cathedral

मेक्सिकन रोमन धार्मिक संप्रदायाचे धर्मगुरू

मेक्सिकन रोमन धार्मिक संप्रदायाचे धर्मगुरू

मेक्सिको देशातील जवळ जवळ ९०% लोकं ख्रिश्चन धर्माचे आहेत. आणि आज २५ डिसेंबर, म्हणजे ख्रिस्मस सण असल्यामुळे इथे प्रचंड गर्दी होती. जणू काही जत्राच भरली होती. या भागातील काही रस्ते बंद केले होते, जेणेकरून लोकांना बिनधास्त फिरता यावं. खाण्यापिण्याची चंगळ होती. अनेक छोट्यामोठ्या टपऱ्या लावल्या होत्या. चर्च च्या मागे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला, चौकात अनेक फेरीवाले खेळणी, दागिने, पर्सेस, चित्र, शोभेच्या आकर्षक वस्तू विकायला बसले होते. त्या चौकात काही लहान मुलं फुग्यांशी खेळत होती, काही पकडापकडी खेळत होती. चौकाच्या मध्यभागी १० ते १२ मजल्यांच्या इमारती एवढं “ख्रिस्मस ट्री” उभारलं होतं. एका भागात काही लोकं पारंपारिक कपडे घालून, विशिष्ट प्रकारची वाद्य वाजवून नृत्य करीत होते (watch video). इतक्या छान छान आणि वेगळ्या गोष्टी मिळत होत्या तिथे की मी तर गोंधळूनच गेले होते. हे घेऊ की ते.

Zocalo square

Zocalo square

खरेदी खरेदी! "क्वानतो क्वेस्टा एस्टो?"

खरेदी खरेदी! “क्वानतो क्वेस्टा एस्टो?”

Mexican traditional dance

Mexican traditional dance

Mexican traditional dance

Mexican traditional dance

Mexican traditional dance

Mexican traditional dance

ही मेक्सिकन लोकं गहूवर्णी असल्यामुळे तशी बऱ्याच प्रमाणात भारतीय लोकांसारखी दिसतात. आम्ही त्यांच्यात अगदी सहजपणे मिसळून जात होतो. आणि या सगळ्या मेक्सिकन मुलांचे केस तर एकसारखेच असतात. म्हणजे कपाळावरचे केस जेल लाऊन सरळ केलेले. त्यामुळे नीरज तर अगदी त्यांच्यासारखाच दिसत होता. रस्त्यात त्याला बऱ्याच जणांनी मेक्सिकन समजून पत्ता देखील विचारला. हे हे!

झोकॅलो वरून चालतच आम्ही “पालासिओ दे बेलास अर्टेस” (Palacio de Bellas Artes) हे मेक्सिकोतील प्रमुख सांस्कृतिक केंद्र बघायला गेलो. तिथे देखील रस्त्यावरच मोठी जत्रा भरली होती. वेगवेगळी सरबतं, कणसं, मेक्सिकन फरसाण, गरमा गरम बिस्किट्स, चिप्स, काय काय म्हणून विकायला होतं. एके ठिकाणी आम्ही राजम्याच्या पराठ्यासारखा पदार्थ खाल्ला. त्यावर कांदा, हिरवी, लाल चटणी लावली होती. मेक्सिकन खाद्य पदार्थांमधील खास वैशिष्ट म्हणजे ३ प्रकारच्या झणझणीत चटण्या, एक म्हणजे “मेक्सिकन सालसा” आणि दुसरं कच्या टोमॅटो पासून बनवलेला “ग्रीन सालसा” आणि आजून एक म्हणजे “ग्वाकमोली” ची चटणी. तसंच “टाको, बुरीटो, टोर्टीला, एन्चीलाडा,फहिता आणि केसडीया हे मेक्सिकोतील प्रसिद्ध आणि चविष्ट अन्नपदार्थ आहेत. म्हणजे स्वस्त आणि मस्त असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत.

चमचमीत मेक्सिकन फूड

चमचमीत मेक्सिकन फूड

"पालासिओ दे बेलास अर्टेस" (Palacio de Bellas Artes)

“पालासिओ दे बेलास अर्टेस” (Palacio de Bellas Artes)

ताजी ताजी बिस्कीटं घ्या, गोड गोड कापूस, भुट्टा लेलो भुट्टा!

ताजी ताजी बिस्कीटं घ्या, गोड गोड कापूस, भुट्टा लेलो भुट्टा!

हे देखील नॉर्थ अमेरिका

हे देखील नॉर्थ अमेरिका

अगदी पहिल्या दिवसापासून आमच्या हॉटेल ते मेट्रो स्टेशन या रस्त्यावर एका कोपऱ्यात एक कॉफी विकणारी बाई सकाळी ४ तास तिची छोटीशी हातगाडी घेऊन उभी राहायची. आणि या कॉफी ची खासियत म्हणजे ही बाई अक्खा “मिल्क मेड” चा डब्बा त्या कॉफीत ओतत असे. इतकी जगावेगळी होती ती कॉफी की आम्ही तिचे रोजचेच गिऱ्हाईक झालो होतो. रोज सकाळी बाहेर पडल्यावर पहिले तिच्या हातची कॉफी प्यावी आणि मग पुढच्या कामाला (भटकायला) लागावं. इतक्या स्वस्त दरात इतकी अप्रतिम कॉफी आजपर्यंत मी प्यायले नाही. मेक्सिकोत लोकं चहापेक्षा कॉफी पिणंच जास्त पसंत करतात.

Best coffee ever!

Best coffee ever!

तसंच अजून एक आमचं नाश्त्याचं ठरलेलं ठिकाण म्हणजे “भाकरीवाली” बाई आणि काका. भारतात तुम्ही पाहिलं असेल, सकाळी ६ वाजल्यापासून जागोजागी गरमागरम पोहे, उपमा, शिरा, खिचडी, इडली सांबार, मेदूवडे, बटाटेवडे विकणारी लोकं हातगाड्या किंवा लाकडी स्टूल घेऊन उभे असतात. आणि हजोरो लोकांची पोटं भागवणाऱ्या या गाड्या सकाळी १० नंतर गायब देखील होतात. तशीच ही भाकरीवाली बाई. ही एकमेव गाडी होती जिथे आम्हाला शाकाहारी काहीतरी मिळालं. त्या भाकरीत राजमा, पालेभाजी, चिकन, पोर्क, बीफ, कांदा, चटण्या, चीज अशा बऱ्याच पर्यायांपैकी आपल्याला हवं ते भरून तव्यावर गरम करून ती द्यायची. आणि आम्हाला काय हवं, ते त्या बाईला सांगणं खूपच सोप्पं होतं कारण तिने सगळं समोरच छोटया डब्यांमध्ये मांडून ठेवलं होतं, आपण फक्त बोट दाखवून सांगायच, बोलायची गरज नाही.

"भाकरीवाली" बाई

“भाकरीवाली” बाई

असो पण आम्हाला इतक्या दिवसांनी एवढी लोकं आणि असं सगळं सणाचं वातावरण पाहून असं वाटलं की उत्तर अमेरिकेत राहून भारत अनुभवायचा असेल तर मेक्सिको ला यावं आणि चार दिवस रहावं. सगळ्यांचं ऐकून आम्ही जर “कॅनकून” ला गेलो असतो, तर ही सगळी मजा अनुभवता आली नसती.

To be continued … Click for Final Part.


Like what you've read? Click here to get our articles delivered to your inbox. 'Like' our Facebook page and help us grow our Facebook community. We share some content exclusively on our Facebook page!

Leave a Comment | Email This Post | Print Print

  • Digg
  • StumbleUpon
  • del.icio.us
  • Facebook
  • Twitter
  • RedditFatal error: Call to undefined function wp_related_posts() in /home/bharar5/public_html/wp-content/themes/prosumer/single.php on line 41